महाराष्ट्र मुंबई

“मागे अहमदाबादेत येऊन ट्रम्प यांनी कोरोना पसरवला, अन् आता…”

मुंबई | ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा जहाल संसर्गजन्य असा नवा अवतार आढळून आल्यानंतर साऱ्या जगाने ब्रिटनवर जणू सामाजिक बहिष्कारच टाकला आहे. ब्रिटनमधील विषाणूचा धसका असा की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई-ठाणे-पुणेसारख्या शहरांना मोठी आर्थिक झीज सोसावी लागेल, पण सावधगिरीचा उपाय म्हणून ही कठोर पावले उचलावीच लागणार आहेत, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मते नव्या विषाणूला घाबरण्याची गरज नाही. देश सतर्क आहे. त्याचवेळी ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅकॉक म्हणतात, नवा कोरोना व्हायरस पहिल्यापेक्षा जास्त खतरनाक असून तो वेगाने हल्ला चढवतो. त्याची संसर्ग क्षमता आधीच्या विषाणूपेक्षा 75 टक्के जास्त आहे. ही माहिती मन विषण्ण करणारी आहे. त्यामुळे भारताच्या आरोग्यमंत्रीनी काहीही म्हटलं असलं तरी चिंता करावी लागेलच, असं  शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

ब्रिटनहून कालपर्यंत जे आले त्यांना 14 दिवस क्वारंटाईन केले. प्रश्न आहे ब्रिटिश पंतप्रधान जॉन्सन यांचा. दिल्लीतील 26 जानेवारीच्या सोहळय़ात जॉन्सनसाहेब प्रमुख पाहुणे आहेत. त्यामुळे ‘बहिष्कृत’ ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे दिल्लीत येतील काय?, असं अग्रलेखात म्हटलंय.

मागे ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी ट्रम्प हे अहमदाबादेत आले व ट्रम्पबरोबरच्या लवाजम्याने कोरोना पसरवण्याचं काम केलं. त्यामुळे ट्रम्पच्या तुलनेत सज्जन व सरळ असलेल्या जॉन्सन यांच्याबाबतीत काय करायचं, हा प्रश्नच आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“बाप राबतो म्हणून अन्न मिळतं हे लक्षात ठेवा, अन् तुम्ही त्याच बापाची चेष्टा करताय”

“आम्ही कुणालाही झटके देत नाही, अनेकजण शिवसेनेत यायला इच्छुक”

“शरद पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठी राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध”

बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या!

कोरोना काळात सेवा देणाऱ्या इंटर्न डॉक्टरांना मिळणार अतिरिक्त भत्ता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या