बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिल गेट्स यांच्याकडून नरेंद्र मोदींचं कौतुक, म्हणाले…

नवी दिल्ली | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होण्यासाठी जी पावलं उचलत आहे, त्याचं बिल गेट्स यांनी पत्र लिहू कौतुक केलं आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने जी पावलं उचलली आहेत त्याचं आणि तुमच्या नेतृत्वाचं मी खरंच कौतुक करतो, अशा शब्दांमध्ये गेट्स यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आहे.

देशातील हॉटस्पॉट ओळखून करोना बाधित रुग्णांना क्वारंटाइन करणं, लॉकडाउन जाहीर करणं, आरोग्य यंत्रणेला पाठींबा देण्यासाठी उचललेली पावलं हे प्रशंसनीय आहे, असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.

रिसर्च आणि डेव्हलपमेंट यासोबतच डिजीटल इनोव्हेशन या गोष्टीवरही सरकारने चांगला भर दिला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकार डिजीटल प्रणालीचा योग्य वापर करत आहे याचं मला कौतुक आहे, असंही बिल गेट्स म्हणाले.

 

ट्रेंडिंग बातम्या-

केंद्राचा मोठा निर्णय! डॉक्टरांवर हल्ला केल्यास दाखल होणार अजामीनपात्र गुन्हा

‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5649 वर

सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकरकमी मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 हजार पार; 24 तासात 1,486 नवे रुग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More