Top News पुणे महाराष्ट्र

कॅनरा बॅंकेचं स्तुत्य पाऊल, हाऊसिंग तसेच एज्युकेशनल लोनला गती देण्यासाठी उपक्रम

पुणे | देशातील चौथी सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक कॅनरा बँक समाज आणि देशाच्या प्रगतीच्या ध्येयाबाबत नेहमीच अग्रेसर राहिली आहे. याच कॅनरा बॅंकेकडून हाऊसिंग लोन आणि एज्युकेशनल लोनसारख्या विभागांना गती देण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी राज्यभरात मोठ्या प्रमाणात मेगा रिटेल एक्स्पोचं आयोजन केलं होतं. अत्यंत यशस्वी ठरलेल्या या एक्स्पोचं आता बॅंकिंग क्षेत्रात चांगलंच कौतुक होत आहे.

परवडणारी गृहनिर्माण योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, भारत सरकारच्या पुढाकाराने कॅनरा बँक महाराष्ट्र राज्यामध्ये गृह कर्जासाठी अर्थसहाय्य देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हाऊसिंग लोन तसेच एज्युकेशन लोन विभागासाठी ही अनेकांची पसंतीची बँक आहे. म्हाडाने दिलेल्या जागा आणि फ्लॅट्ससाठी चांगली संख्या असलेल्या कॅनरा बँकेला यामध्ये चांगलीच प्रतिष्ठा मिळालेली आहे.

दरम्यान, याच उद्देशानेच कॅनरा बँक हाऊसिंग लोन आणि एज्युकेशन लोनसारख्या विभागांना गती देण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी राज्यभरात मोठ्या प्रमाणात मेगा रिटेल एक्स्पो घेण्यात आला.

बँकेच्या अव्वल व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील निवडक तीन स्थळांवर म्हणजेच पिंपरी, बाणेर व कोरेगाव पार्क याठिकाणी या एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं होतं. या एक्स्पोच्या अध्यक्षस्थानी पुणे सर्कलचे सरव्यवस्थापक श्री सुबोध कुमार होते. बॅंकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर बी. बी. प्रधान, असिस्टंट जनरल मॅनेजर अनंत जलोन्हा यावेळी उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

नव्या कृषी कायद्याविरोधात राहुल गांधींची आज ट्रॅक्टर रॅली!

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

…पण माझ्या शेतकऱ्यांसाठी मोदींचे अश्रू निघत नाहीत- सुप्रिया सुळे

‘या’ मुलाचा व्हिडीओ पाहून शंकर महादेवन म्हणाले…’एकदा तरी त्याला भेटण्याची संधी मिळो’

धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा; शरद पवार, फडणवीस होते हजर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या