बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमृता फडणवीस यांच्यावर कमेंट करणं तरूणाला पडलं महागात!

पुणे | राज्याच्या राजकारणात पुरुष नेतेमंडळी किंवा महिला नेत्या देखील टीका-टिपण्णी करण्यात जेवढ्या पटाईत नसतील, तेवढ्या पटाईत राज्याच्या मिसेस उपमुख्यमंत्री आहेत. त्या राजकारणात नाहीत पण त्यांनी केलेली ट्विट चर्चेत राहतात, त्यांनी केलेल्या कमेंटच्या बातम्या होतात. विरोधक त्यांच्यावर तुटून पडतात, तर कार्यकर्ते नेहमीच त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत असतात. मात्र त्यांना कधी या गोष्टींचा फरक पडलेला दिसत नाही. अमृता फडणवीसांना ट्रोल करणारे अनेक आहेत पण तुम्ही सुद्धा त्यांना कधी ट्रोल केलंय का?, असं असेल तर हा व्हिडीओ नीट पाहा… अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह टीका करणं तरूणाच्या चांगलंच अंगलट आलंय.

कुठला कार्यक्रम असो किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, अमृता फडणवीस नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यांवर व्यक्त होतात. त्यांनी केलेली राजकीय टिप्पणी अनेकदा चर्चेचा विषय असते. त्यांनी केलेल्या खासगी आय़ुष्यातील खुलाशांची देखील जोरदार चर्चा होते. अमृता फडणवीसांची काही मतं वादग्रस्त ठरतात तर कधी त्यांना यामुळे ट्रोलर्सचा देखील सामना करावा लागतो…. भाजप-शिवसेनेची युती तुटली आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अमृता फडणवीस या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करताना दिसल्या. एकेरी उल्लेख त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

राज्यात आता शिंदे फडणवीस सरकार आलेलं असतानाही अमृता फडणवीस चौफेर मुद्द्यावर भाष्य करताना दिसत आहेत. ट्रोल झाल्या तरी अमृता फडणवीस व्यक्त होण्याचं थांबवत नाहीत. पण आता अमृता फडणवीसांना ट्रोल करणं एका तरणाच्या चांगलंच अंगलट आलंय. अमृता फडणवीसांबाबत अश्लील ट्विट करणाऱ्याला थेट तुरूंगाची हवा खावी लागलीय. जुन्नर मधल्या अमित वायकर नावाच्या तरूणाने अमृता फडणवीसांवर एक अश्लील कमेंट केली होती. यानंतर भाजप नेत्या आशा बुचके यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि वायकरला तुरूंगाची हवा खावी लागली.

आळेफाटा पोलिसांनी या तरूणाला अटक केली आणि त्याला जुन्नर न्यायालयात हजर केलं. त्या तरूणाची तूर्तास जामिनावर मुक्तता करण्यात आलीय पण अमृता फडणवीसांवर ट्रोल करणं मात्र त्या तरूणाला चांगलंच भोवलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“विदर्भात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आमचा पक्ष मोठा”

‘जे शिवसेनेतून फुटलेत, त्यांना आडवं करू’; चंद्रकांत खैरे आक्रमक

24 तासांमध्ये संजय शिरसाटांचा यू-टर्न, आता म्हणतात…

VLC Media Player या अॅपवर भारतात बंदी, ‘हे’ मोठं कारण आलं समोर

मोठी बातमी! जात पडताळणी समितीचा समीर वानखेडेंना दिलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More