‘एखादा पेहराव ठराविक व्यक्तींनाच अश्लील… ‘, चित्रा वाघ-उर्फीच्या वादावर रूपाली चाकणकरांची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजप(BJP) नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. आता हा वाद महिला आयोगा पर्यंत गेला आहे. त्यामुळं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतेच चित्रा वाघ यांनी ट्विट करत महिला आयोगावर सवाल उपस्थित केला होता. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, भाषा नको तर कृती हवी आहे. सार्वजनिक ठिकाणी उघडं नागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे बिभत्स आहे, त्याला महिला आयोग समर्थन करत आहे का?, असा सवाल करत त्यांनी महिला आयोगावर प्रश्न उपस्थित केला आहे.

चित्रा वाघ यांच्या या प्रश्नावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं आहे. चाकणकर म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाकडं आतापर्यंत 10 हजार 907 तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी 9 हजार 520 तक्रारींचा आम्ही निकाल काढला आहे.

राज्य महिला आयोग आपलं काम व्यापक स्वरूपात करत असते. त्यामुळं महिला आयोगानं काय कराव हे कोणी सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात त्यांनी चित्रा वाघ यांना सुनावलं.

कोणी काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पोषाख ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असतो पण तो दुसऱ्यांना वाटत नसतो. त्यामुळं याबतीत आयोग वेळ घालवू शकत नाही, असंही चाकणकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-