Top News पुणे महाराष्ट्र

आयुक्तांनी उचलला पोलिसांना फिट ठेवण्याचा विडा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पिंपरी | तंदुरुस्त आणि फिट आयपीएस अधिकारी असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपल्या सहकारी पोलिसांनाही फिट ठेवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ते शहर पोलिस दलातील सर्व पोलिसांना स्मार्ट वॉच तसेच सायकल देणार आहेत.

पोलिसांना कायम फिट ठेवण्याच्या हेतूने घेण्यात येणारा हेल्थ 365 हा कार्यक्रम उद्या सकाळी नऊ वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे.

आपल्या आरोग्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांना स्मार्ट वॉच आणि सायकलद्वारे आरोग्याकडं लक्ष ठेवता येणार आहे. या दोन्ही वस्तूंचं वाटप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, अल्ट्रामॅन आणि आर्यनमॅन हा जागतिक पुरस्कार कृष्ण प्रकाश यांनी मिळवला आहे. हा पुरस्कार मिळवणारे कृष्णप्रकाश हे नागरी सेवेतील पहिलेच अधिकारी आहेत.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्र सरकारने करायला हवा- राजेश टोपे

“संभाजी महाराज आम्हाला माफ करा, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या”

“राष्ट्रवादी काँग्रेसनं बनवाबनवी केली, ते पंचायत समिती सदस्य भाजपमध्येच”

MPSC च्या परीक्षा जाहीर, ‘या’ तारखेला होणार परिक्षा

सुशांत सिंग राजपूतच्या कामाची उच्च न्यायालयाने केली प्रशंसा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या