बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजकारण बाजूला सारून समाजकारण करणारा नेता; सर्व धर्मीयांचे 114 अंत्यविधी पार पाडले

पुणे | कोरोनाच्या दहशतीनं सगळीकडेच भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोना रूग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईकही अंत्यविधी करण्यास पुढे येत नाही. तर कोरोनाला घेऊन राजकीय नेत्यांची अनास्था खूपच लाजिरवाणी आहे. मात्र पुण्याच्या मंचर येथील शिवसेनेचा एक नेता मात्र याला अपवाद ठरला आहे.

शिवसेनेचे नेते दत्ता गांजाळे या नेत्यानं सर्व धर्मियांच्या अंत्यविधीचा जणू वसाच हाती घेतला आहे. आत्तापर्यंत सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी 114 मृतदेहांचे सर्व विधी स्वतः पार पाडले आहेत. त्यांचं हे कार्य सर्व राजकारण्यांना जणू एक चपराक आहे.

बुरसटलेल्या राजकारणात समाजकारण करणारे, माणुसकी जपणारे शिवसेनेचे नेते दत्ता गांजाळे, पुण्याच्या मंचरचे सरपंच असताना गावातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. तेव्हा नातेवाईक देखील मृतदेहाला स्पर्श करत नव्हते तेव्हा गांजाळेंनी तो अंत्यविधी पार पाडला. तेव्हापासून हाती घेतलेला वसा त्यांनी मागे टाकलाच नाही. गांजाळे सरपंच होते तेंव्हा त्यांनी 56 आणि त्यानंतर 58 असे आत्तापर्यंत 114 अंत्यविधी पार पाडले आहेत, त्यांच्या सहकार्याविना हे कार्य शक्यच नव्हतं. गांजाळेंनी या कार्यात धर्म, जात या सर्व विचारांना ही मागे टाकलं आहे, म्हणूनच सर्व धर्मीय त्यांना देवदूत म्हणतात.

दरम्यान, एकीकडे कोरोना रुग्णांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तर दुसरीकडे सरकार सत्ता टिकविण्यासाठी आणि विरोधक सत्ता मिळविण्यासाठी वाट्टेल ते राजकारण करण्यात व्यस्त आहे. अशात दत्ता गांजाळेंनी रक्तापलीकडचं नातं जपून एक आदर्श घडविला आहे. यातून इतर राजकारण्यांनी नक्कीच धडा घेतला पाहिजे.

थोडक्यात बातम्या

“…म्हणून शेवटचा पर्याय म्हणून लाॅकडाऊनचा विचार करावा लागतोय”- राजेश टोपे

“नाशिकच्या ऑक्सिजन गळतीमधील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणार मदत”

एकाच विमानात 53 कोरोनारुग्ण आढळल्याने ‘या’ देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर घातली बंदी

कोरोनापासून बचावासाठी WHO ने जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना!

देशासाठी कायपण! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रतन टाटांनी उचललं आणखी एक महत्त्वाचं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More