Top News देश

कंपन्यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार कापू नये- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |  माझा देशवासियांना आग्रह आहे, जर अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, शक्य तितकं काम घरातूनच करा, सरकारी कर्मचारी, आरोग्य अधिकारी, मीडिया यांची सक्रियता आवश्यकता आहे, मात्र अन्य नागरिकांनी स्वत:ला विलगीकरण करावं. तसंच कंपन्यांनी या दरम्यान घरून काम करणार्‍यांचे वेतन कापू नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. (Companies should not cut the salaries of employees who work from home pm narendra Modi)

मध्यवर्गापासून गरीब वर्गापर्यंत सर्वांनाच कोरोनाची झळ बसली आहे. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा कर्मचाऱ्यांच्या वेतनात कंपन्यांनी कपात करु नये. त्यांच्यापुढेही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, असं ते म्हणाले. (Companies should not cut the salaries of employees who work from home pm narendra Modi) आज मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशवासियांना संयम राखण्याचं आवाहन करताना प्रत्येक भारतीयाने सजग राहणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

घरातील आवश्यक सामानाची साठेबाजी करू नका. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरच राहणार आहे. दैनंदिन व्यवहार सामान्यपणेच सुरु ठेवा जीवनावश्यक वस्तू साठवण्याची गरज नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तर 22 मार्चला जनता कर्फ्यू असेल. सकाळी 7 पासून रात्री 9 पर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये. हा जनता कर्फ्यू खबरदारीने पाळा. कोणीही घराबाहेर पडू नका, अत्यंत आवश्यक असेल, पर्याय नसेल तरच त्या दिवशी घराबाहेर पडा, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, आज 130 कोटी देशवासियांकडे काही मागण्यासाठी आलोय. मला तुमचा काही काळ हवाय. संकट टळलेलं नाही. प्रत्येक भारतीयानं सजग राहायला हवं. कोरोनावर एकच मंत्र काम करेल ‘हम स्वस्थ तो जग स्वस्थ’, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

संकल्प आणि संयम हेच कोरोनाला उत्तर आहे- नरेंद्र मोदी

कोरोनावर एकच मंत्र काम करेल, ‘हम स्वस्थ तो जग स्वस्थ’- नरेंद्र मोदी

रामदेव बाबा टाकणार तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल; केली कंपनीची स्थापना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या