बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Remdesivir बनवणाऱ्या कंपन्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | देशभरात वाढत्या कोरोनाच्या संसर्गाने गोंधळ उडालाय. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढलीय की रुग्णांना बेड आणि आवश्यक औषधं देखील मिळणं अवघड होऊन बसलंय. यात रेमडेसिवीर औषधाची कमतरता हा सर्वात मोठा मुद्दा ठरतो आहे.

वाढत्या रुग्ण संख्येसोबतच रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर औषधाचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी देशभरातील विविध ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. यामुळेच रेमडेसिवीर निर्माता कंपन्यांनी आपल्या उत्पादनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रेमडेसिवीरची अचानक वाढलेली मागणी लक्षात घेता भारतातील रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या उपक्रमांची माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी दिली आहे. यामध्ये निर्यात थांबवणं, नवीन क्षमतांसाठी वेगाने मंजुरी, औषधासाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्म्युलेशनची निर्यात थांबवणं अशा उपक्रमांचा समावेश असल्याचं निर्मला सितारामण यांनी सांगितलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

खळबळजनक! एकाच रूग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण

रसेल,कमिन्सने झोड झोडं झोडलं पण चेन्नईला गोलंदाजांनी तारलं, चेन्नईचा 18 धावांनी विजय

अवघ्या दोन तासातच उरका लग्न अन्यथा भरावा लागेल इतक्या हजारांचा दंड

‘ब्रेक द चैन’ अंतर्गत महाराष्ट्रात अधिक कडक निर्बंधांसह नवी नियमावली जाहीर, वाचा नवे नियम

क्लास राहुल! विराट कोहली आणि रोहित शर्माला मागे टाकत बनला हीरो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More