बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताच्या ‘या’ खेळाडूची धोनीसोबत तुलना, तो म्हणतो, “धोनीसारखा कोणी नाही”

मुंबई | राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला की चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीसारखा दुसरा कोणीही असू शकत नाही. धोनीशी केलेल्या तुलनाला उत्तर देताना 26 वर्षीय तरूण संजू सॅमसन राहणेचं चांगले आहे. मला स्वत:वर सारखे राहायचे आहे, असं संजू सॅमसन म्हणाला.

मला कर्णधार पद भेटेल मला वाटले नव्हते. मी कर्णधार होण्याची शक्यता आहे, असं मला वाटले नव्हते. मात्र, संघाचे मालक मनोज बदाले यांनी मला सांगितलं की, तु संघाचं नेतृत्व करशील याची मला खात्री आहे, असं त्यांनी मला सांगितलं. मला वाटते की आमच्या टीम मॅनेजमेंटने लिलावात उत्कृष्ट काम केले आणि जवळजवळ पाहिजे ते खेळाडू आम्हाला मिळाले. यंदाच्या मोसमात प्रत्येक खेळाडूची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

संजू सॅमसनने कुमार संगकाराबद्धल सांगितले की, त्याची सुंदर कव्हर ड्राईव्ह ही माझी पहिली आठवण आहे. त्याने संगकाराबरोबर काम करण्याची उत्सुकता देखील यावेळी व्यक्त केली. विशेष म्हणजे कुमार संगकारा राजस्थान राॅयल्स क्रिकेटचा संचालक आहे.

दरम्यान, गेल्या हंगामात ‘आयपीएल’दरम्यान राजस्थान राॅयल्सचा संघ चांगला खेळ दर्शविण्यात अपयशी ठरला. त्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या नावासह त्याच्या संघातील काही खेळाडूंना सोडण्यात आले. आणि संजू सॅमसनला कर्णधार बनवण्यात आलं. ख्रिस माॅरिसचा देखील राजस्थानच्या संघात समावेश करण्याता आला.

थोडक्यात बातम्या –

राज्यात लागू शकतो ‘इतक्या’ दिवसांचा लॉकडाऊन; महत्त्वाची माहिती आली समोर

“तुमचे चेहरे पाहून जगात कोरोना नसल्याची खात्री पटली, मीही मास्क काढून बोलतो”

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा कोरोनाचं नवं हॉटस्पॉस्ट; एकाच दिवसात 10 हजार रुग्ण!

राहुल तेवतियाचा खतरनाक अंदाज, नेट प्रॅक्टिसचा व्हिडीओ तुफान व्हायरल

अवघ्या 12 वर्षांच्या मुलानं केली आत्महत्या, कारण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More