Top News महाराष्ट्र मुंबई

“स्पर्धा करा, पण महाराष्ट्रातून ओढूनताणून काही नेऊ देणार नाही हे लक्षात ठेवा”

मुंबई | महाराष्ट्रात काहीजण येत आहेत, पण त्यांना महाराष्ट्राची ‘मॅग्नेटिक’ ताकद काय आहे हे माहीत नाही. स्पर्धा करा आणि पुढे जा! पण ओढूनताणून जर कोणी काही घेऊन जात असेल तर ते आम्ही नेऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावलं आहे.

‘इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स’ यांच्या वतीने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उद्योजकांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की,”मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी ‘इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स’ पुढाकार घेत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे”.

दरम्यान, महाराष्ट्र हे एक वेगळे राज्य आहे. त्याला एक वेगळी संस्कृती आहे, संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाहीत. उलट अन्य राज्यातील उद्योगच महाराष्ट्रात येतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

सोनिया गांधी आणि राहुल गांधींविषयी आदर, पण….- उर्मिला मातोंडकर

मला जो त्रास झाला तो तुझ्या वाट्याला येऊ नये, पंकजाताई काळजी घे- धनंजय मुंडे

“आठ महिने मंत्रालयात पाऊल न टाकणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने इतिहासात पाहिला नाही”

मंदिरातील पुजारी अर्धनग्न, मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का?- तृप्ती देसाई

ईडीने नारायण राणे यांच्या संपत्तीची चौकशी करावी; शिवसेना खासदाराची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या