बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…आता तुम्हीच सांगा मोदी साहेब?’; चिमुकलीनं थेट पंतप्रधानांकडे केली तक्रार, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक लहान मुला-मुलींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात. काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर लहान मुलांना एखाद्या गोष्टीची तक्रार असली तर त्याचेही मजेशीर व्हिडीओ असतात. मात्र, या व्हिडीओमध्ये एका चिमुकलीनं चक्क पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे. हा 1 मिनिटांचा व्हिडीओ सध्या सगळीकडे प्रचंड व्हायरल होत आहे.

कोरोनाकाळात सगळेच घरात राहून कंटाळले आहेत. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. कोरोनानं प्रत्येकाच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. कोरोना रोखण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांनी लॉकडाऊन, विकेण्ड लॉकडाऊन तसंच संचारबंदीसारखे नियम लागू केले आहेत. या संपूर्ण काळात शाळादेखील बंद आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातूनच शिक्षण घ्यावं लागत आहे. मात्र, याच बाबतीत आता एका चिमुकलीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ऑनलाईन वर्गांमुळे विद्यार्थ्यांना तासंतास मोबाईल समोर घेऊन बसावं लागतं. मात्र, इतका वेळ मोबाईल घेऊन बसण्याची सवय नसल्यानं त्यांना हे कंटाळवाणं वाटू लागतं. याच पार्श्वभूमीवर काश्मीरच्या या चिमुकलीनं आपली तक्रार पंतप्रधानांना सांगितली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी ही चिमुकली अवघ्या 6 वर्षांची आहे. ती पंतप्रधानांना प्रश्न करत आहे, की ‘इतकं जास्त काम लहान मुलांना असतं का? मी लहान आहे, तरी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत माझे वर्ग सुरू असतात. इंग्लिश, गणित, उर्दू, कम्प्युटर या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो. इतकं जास्त काम मोठ्या मुलांना असतं माझ्यासारख्या लहान मुलांना नाही. आता तुम्हीच सांगा मोदी साहेब?, असा निरागस प्रश्न तिनं विचारला आहे.

दरम्यान, चिमुकलीचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. आतापर्यंत 1 मिनिटाचा व्हिडिओ 32 हजारहून अनेकांनी पाहिला आहे. तर, जवळपास 3 हजार जणांनी लाईक आणि 630 जणांनी तो रिट्विट केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत अनेक यूजरनं तिचं कौतुक केलं आहे.

 

पाहा व्हिडीओ –

 

थोडक्यात बातम्या

‘संबित पात्रा म्हणजे गटारीतला कीडा’; लाईव्ह कार्यक्रमात काँग्रेस प्रवक्त्या भडकल्या

“अर्थमंत्रालयात कमी IQ वाले लोक, मोदींना तर अर्थव्यवस्थाच समजत नाही”

नितीन गडकरी म्हणजे चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस- अशोक चव्हाण

“चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली”

“एक रुपया इंधन दरवाढ झाली की आंदोलने करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते आता कुठे लपलेत?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More