मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेची पोलिसांत तक्रार; पाहा काय आहे प्रकरण…

मुंबई | अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. जुहू येथील 6 मजली रहिवासी इमारतीत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केलं आहे, असा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे.

सोनू सूदवर महाराष्ट्र राज्य शहर नियोजन कायद्याखाली बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई महापालिकेने केली आहे.

या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकामात बदल करण्यात आला आहे. प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय अशाप्रकारे कोणतेही अनाधिकृत बदल करता येत नाहीत, असं बीएमसीने सांगितलं आहे. मात्र सोनू सूदने याबाबत नकार दिला आहे.

आपल्याला बीएमसीकडून परवानगी मिळाली असून महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटकडून परवानगी मिळणं बाकी आहे, असं सोनू सूदने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबई उच्च न्यायालयाचा श्रीपाद छिंदमला दणका!

“लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटतं”

ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले…

ट्रम्प समर्थकांचा कॅपिटल भवनाबाहेर राडा, गोळीबारात महिलेचा मृत्यू

‘…तर कायमस्वरुपी बंदी आणू’; ट्विटरचा ट्रम्प यांना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या