बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

मुंबई | एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडणार असल्याचं जाहीर केलं. कोराना झालेला असतानाही अनेक शिवसैनिकांना जमवून गर्दी करत कोविड प्रोटोकाॅल तोडल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काल शिवसेनेची बैठक पार पडली. कोरोना पाॅझिटिव्ह असल्या कारणाने ही बैठक त्यांनी ऑनलाईन घेतली. त्यानंतर त्यांनी फेसबूक लाइव्ह येऊन जनतेशी संवाद साधला.

सायंकाळी पाचनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर वर्षा निवासस्थान सोडणार असल्याचं जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मलबार हिल येथील वर्षा निवासस्थानी जमले होते.

भाजपचे दिल्लीतील युवा नेते यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार दिली आहे. आता यावर काय कारवाई केली जाईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

थोडक्यात बातम्या

‘पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी…’, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

‘मला एकाच गोष्टीचं वाईट वाटलं…’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक

‘सरकारचा फायदा घटक पक्षांना, शिवसैनिक मात्र फक्त भरडला गेला’; एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट

“वाद सैन्य दलाच्या भरतीचा होता, मात्र चलाखीने शिवसेनेचा मुद्दा पुढे आणण्यात आला”

“समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More