महाराष्ट्र मुंबई

…त्यामुळेच सोनू सूदवर कारवाई करण्यात आली- राम कदम

मुंबई | अनधिकृत बांधकाम प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याच मुद्यावनरुन भाजप पक्षाचे नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी या प्रकरणात उडी घेऊन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. केवळ सूड भावनेतूनच सोनूविरोधात कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.

कोरोनाच्या काळात जनतेला मदत करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं होतं. त्यावेळी जे सरकारने करायला हवं ते काम सोनूने केलं होतं. सोनूने लोकांना प्रत्यक्ष भेटून मदत केली. त्यामुळे शिवसेनाचा जळफळाट झाला. त्यामुळेच सोनूवर कारवाई करण्यात आल्याचा दावा राम कदम यांनी केलाय.

आधी कंगनावर कारवाई केली. आता सोनू सूजवर कारवाई करण्यात येत आहे. हे ठाकरे सरकार आहे की सुडाचे सरकार? कंगनाच्या कार्यालयावर जेसीबी पाठवला. आता सोनूचा नंबर? गरीब मजुरांना स्वत:च्या पैशाने गावी पाठवण्याचं काम सरकारचं होतं. ते सोनूने केलं. त्याचा दोष काय?, असा सवाल राम कदम यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्या’ ट्विटची शहानिशा करूनच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेन- अजित पवार

“थोरातांनी बाबर खानदानावर असलेली काँग्रेसची वादातीत निष्ठा सिद्ध केली”

‘तुम्ही मर्द असाल तर…’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

गोणीत घालून नाल्यात फेकलं तो २४ तास ओरडत होता; धक्कादायक कारण आलं समोर

अमृता फडणवीसांचं नवं गाणं; ‘डाव मांडते भीती’!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या