बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार

पुणे | कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तींनी एका ऊसाचे गुऱ्हाळ चालवणाऱ्या महिलेला मारहाण केल्याची तक्रार केली गेली आहे. पुण्यातील कोथरूड पोलीस चौकीत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोथरूड भागात असलेल्या रामबाग काॅलनीतील गणेश कुंज सोसायटीच्या जवळ असलेल्या एका ऊसाच्या गुऱ्हाळावरून हा वाद पेटला आहे. काही दिवसांपुर्वी या सोसायटीतील नागरिकांनी या गुऱ्हाळामुळे त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. तर हे गुऱ्हाळ अनिधिकृत असल्याचं देखील या नागरिकांचं म्हणणं आहेे. तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

मेधा कुलकर्णी यांनी सोसायटीमधील राहणाऱ्या नागरिकांसोबत हे गुऱ्हाळ हटवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, गुऱ्हाळ चालवणाऱ्या दिपाली चव्हाण या महिलेशी आणि त्याच्या पतीशी त्यांची बाचाबाची झाली. यावेळी मेधा कुलकर्णी आणि त्याच्यासोबतच्या लोकांनी त्या महिलेला मारहाण केल्याचा आरोप दिपाली चव्हाण या महिलेने केला आहे. तर मेधा कुलकर्णी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. हे गुऱ्हाळ अनिधिकृत असून स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे, असं मेधा कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी कुलकर्णी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र या घटनेकडे इतर पक्षांनी डोळसपणे पाहिलं पाहिजे आणि पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज काढून योग्य दिशेने तपास केला पाहिजे, असंही मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

“पुढील दहा दिवसांत पुण्यातील रुग्णालयात एकही बेड शिल्लक राहणार नाही”

फेसबुक, मेसेंजरसह व्हॅाट्सअपची सेवा काही काळासाठी ठप्प

“मोदींना विरोध म्हणजे भारतमातेला विरोध, तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागणार”

“राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष असून सर्व निर्णय शरद पवारच घेतील”

“महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More