बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची संपूर्ण नियमावली; वाचा एका क्लिकवर…

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारतर्फे ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

22 एप्रिल म्हणजेच आज रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्रात नेमकं काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?, वेळ काय असणार? या आणि अशा इतर सर्व शंकांचं निरसन ही बातमी वाचल्यानंतर होईल. आज रात्रीपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. यादरम्यान मुंबई लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर जिल्ह्यात किंवा जिल्हांतर्गत प्रवास करता येणार नाही. आज पासून 1 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यभरात जिल्हाबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये फक्त 15 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार. लग्नसमारंभासाठी एका हॉलमध्ये फक्त 25 जणांना ते पण 2 तासाच्या वेळ मर्यादेसह परवानगी देण्यात येणार आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास 50 हजाराचा दंड देखील वसूल केला जाणार आहे.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे आणि त्यांच्या हातावर शिक्का देखील बंधनकारक करण्यात आला आहे. खाजगी वाहतूक करणाऱ्यांना फक्त अत्यावश्यक कारणासाठीच परवानगी देण्यात आली आहे जर जाणीवपूर्वक या नियमांचे उल्लंघन केलं तर 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. त्याव्यतिरिक्त महाराष्ट्रभरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस धावणार असून त्यामध्ये फक्त अत्यावश्यक काम असणारे लोक आणि अत्यावश्यक सेवेत काम करणारे लोक यांनाच 50% उपस्थितीत प्रवास करता येणार आहे. याशिवाय इतर सर्व नियम हे या आधी सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीप्रमाणेच राज्यभरात लागु असणार आहेत .

थोडक्यात बातम्या –

आरे भावा तुच जिंकलाय टॉस! टॉसदरम्यान गोंधळला विराट कोहली, पाहा व्हिडीओ

चिंता वाढली… महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

मोठी बातमी! ‘या’ राज्यातील प्रत्येक व्यक्तिला मोफत लस मिळणार, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

“लॉकडाऊनचा निर्णय मान्य, पण…”; अमृता फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला

उद्याचा पंतप्रधानांचा पश्चिम बंगाल दौरा रद्द; ऑनलाइन रॅलीचे आयोजन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More