बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कामे वेळेत आणि दर्जेदारपणे पू्र्ण करा, अन्यथा…’; अशोक चव्हाणांनी कंत्राटदारांना भरला दम

मुंबई | सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रखडलेल्या कामांबाबत संबंधित कंत्राटदारांना चांगलंच खडसावलं आहे. जे कंत्राटदार वेळेत आणि निविदेतील निकषानुसार दर्जेदार काम करणार नाहीत, त्यांना काळ्या यादीत टाकलं जाईल, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला.

मराठवाडा विभागातील 24 राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा अशोक चव्हाण यांनी आज आढावा घेतला. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू असलेल्या 14 रस्त्यांचा आढावा अशोक चव्हाण यांनी घेतला.

पुरेशी आर्थिक व तांत्रिक क्षमता नसताना मोठी कंत्राटे घ्यायची आणि मिळालेली कामे इतर कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेण्याचा प्रकार मागील काही वर्षांमध्ये वाढीस लागला आहे. परंतु, यातून कामांचा दर्जा खालावत असून, कामे वर्षानुवर्षे रखडू लागली आहेत. या प्रकारामुळे जनतेला नाहक भुर्दंड सोसावा लागतो. हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असं अशोक चव्हाण म्हणाले.

रस्त्यांची कामे करताना भूसंपादन, वन विभागाचे परवाने यासह इतर अडचणी लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात. प्रसंगी यासाठी राज्यस्तरावर महसूल विभागाबरोबर बैठक घेण्यात यावी. तसेच अशा अडचणी येऊ नयेत, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावे. तसेच रस्त्यांची बाजूला असलेल्या जमिनींचे सिमांकन करण्यासाठी आणि त्याची नोंदणी महसूल विभागात करण्यासंदर्भात यंत्रणा विकसित करावी, असं चव्हाण म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“सरकारचं लसीकरण धोरण योग्यच, ते तज्ज्ञांनी विचार विनिमय करुन तयार केलंय”

‘कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांसाठी मोठा निर्णय’; यशोमती ठाकूर यांची मोठी घोषणा

राहुलचा मृत्यूआधीचा व्हिडीओ शेअर करत पत्नीने रूग्णालयावर केले आरोप, मरणापूर्वीचा व्हिडीओ आला समोर

“भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय, सर्वाधिक छळ गोपीनाथ मुंडेंचा झाला”

‘…हे पाहून अतिशय दु:ख होतय’; लालू प्रसाद यादव यांनी मोदींना सुनावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More