बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

31 मार्चच्या आत पूर्ण करा ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा फटका

मुंबई | आज आपण अशा कामाची यादी पाहणार आहोत. जी कामे तुम्हाला 31 मार्चच्या आधी करावी लागणार आहेत. मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. महिन्यात बॅंकिंग तसेच इतर आर्थिक बाबींसंदर्भात सर्व महत्त्वाची कामे पार पाडावी लागणार आहेत. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये नोकरी बदलली आहे किंवा नवीन जॉबला सुरूवात केली आहे, तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नासंबंधीची माहिती फॉर्म 12B( Form-12B) मध्ये भरून तुमच्या कंपनीकडे सादर करणे बंधनकारक आहे. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा टीडीएस (TDS) योग्य प्रमाणात कट होईल. कलम 2008 नुसार जर तुम्ही दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक टॅक्स जमा करत असाल तर तुम्ही हफ्त्यामध्ये आयकर कर कायदा भरणा करू शकता. एकूण चार हफ्त्यांमध्ये आयकर जमा करायचा असतो.

बॅकिंग केवायसी अपडेट करायची असेल तर तुम्ही 31 मार्चपर्यत बॅकिंग केवायसी अपडेट करू शकता. बॅंकमध्ये तुमचा रहिवासी पुरावा सादर करणे, अपडेट पॅनकार्ड किंवा आधार कार्ड सादर करणे किंवा इतर महत्त्वाचे डॉक्युमेंट सादर करणे या कामांचा समावेश होतो. केवायसीसाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर तुमच्याकडून कदाचीत दंड आकारण्यात येऊ शकतो.

आधार कार्डला पॅनकार्ड लिंक केले नसेल तर, 31 मार्चच्या आत तुमचे पॅन कार्ड आधारकार्डला लिंक करून घ्या. 31 मार्च ही आधार-पॅन लिकिंगसाठी अंतिम तारीख आहे. 31 मार्चनंतर देखील आधारला पॅन लिंक न केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. तुम्हाला टीडीएस (TDS) भरावा लागेलच सोबतच तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! जो बायडन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

होळीच्या दिवशी पांढऱ्या कपड्यांना आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या या मागचं खरं कारण

रशियाला मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

रशिया-युक्रेन युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More