बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला 6 महिने पूर्ण; 26 मे रोजी शेतकरी काळा दिवस पाळणार

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. मात्र सरकारने आद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 मे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने मागण्या मान्य न केल्याविरोधात देशभरात 26 मे रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर देशातील विरोधी पक्षांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. याबाबत 12 पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केलं आहे.

आम्ही तात्काळ कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करतो. तसेच स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशीनुसार शेत मालाला हमीभावाची कायदेशीर तरतूद द्यावी, अशीही मागणी करतो. या मागण्यांवर सरकारने ताठरता सोडावी आणि तात्काळ शेतकऱ्यांसोबत चर्चेला सुरुवात करावी, असं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे.

12 मे 2021 रोजी आम्ही संयुक्तपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. यात सीमेवरील लाखो अन्नदात्यांना साथीरोगापासून वाचवण्यासाठी कृषी कायदे मागे घ्या. जेणेकरुन ते सीमेवरुन परतून भारतीयांसाठी आपलं अन्न पिकवण्याचं काम सुरु ठेऊ शकतील, असं विरोधी पक्षांनी पत्रात म्हटलंय.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर अखेर रामदेव बाबांकडून वक्तव्य मागे!

माणुसकीचं नातं कसं असावं हे निलेश लंकेंनी दाखवलं- जयंत पाटील

कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही पगार देणार, घर आणि मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च टाटा उचलणार

“वादळ 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाही”

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात अतिदिव्यांग व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोना लस; प्रशासनाचा स्तुत्य निर्णय

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More