बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहरांची चिंता वाढली; आजपासून कठोर निर्बंध

ठाणे | कल्याण आणि डोंबिवलीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. करोना वाढीला ब्रेक लावण्यासाठी कठोर निर्णय घेत प्रशासनाने आजपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्स, बार, हॉटेल्स आणि दुकाने सुरू ठेवण्यासाठीच विशिष्ट वेळ ठरवून देण्यात आली आहे. याबरोबरच लग्न समारंभांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या कोरोना बाधितांना सोसायटीच्या आवाराबाहेर फिरू देऊ नये असे निर्देशही वसाहतींना देण्यात आले आहेत. काल 24 तासांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये तब्बल 392 नवे कोरोनाबाधित सापडले. यामुळे प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या संसर्गवाढीला अटकाव कसा करायचा हा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी तातडीने पोलीस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनाची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी कठोर निर्बंध लागू करण्याबाबत निर्देश दिले. कल्याणमध्ये ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशा सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 200 च्या आसपास आहे. तसेच सुमारे 300 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, अशी माहितीही सूर्यवंशी यांनी दिली आहे.

दरम्यान, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांना यातून वगळण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या –

धक्कादायक! रागाच्या भरात डिलिव्हरी बॉयनं फोडलं तरुणीचं नाक, कारण ऐकून तुम्हाही व्हाल हैराण

“सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे हेच त्यांचे वकील”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्याने निर्बंध लावण्याचा विचार- मुरलीधर मोहोळ

दीड वर्षाच्या मुलाच्या पोटात आढळला मृत गर्भ, पुण्यातील ‘या’ रूग्णालयात पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; पायाला झालीय गंभीर दुखापत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More