बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यातील नागरिकांचा चिंतेत भर; कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

कोल्हापूर | महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असताना महाराष्ट्रातील विविध भागांमधून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’, असल्याचं गंभीर चित्र दिसून येत आहे. त्यातच म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे.

म्युकरमायकोसिस आजाराने संपूर्ण महाराष्ट्रात काही दिवसांपासून कहर माजवला असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोल्हापूरमध्ये म्युकरमायकोसिसचे काल 08 नवे रुग्ण आढळून आले.

कोल्हापूरमध्ये सध्या म्युकरमायकोसिस या आजाराच्या 133 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकीकडे कोरोना परिस्थिती आटोक्यात येत नसताना या आजाराचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसेच आत्तापर्यंत 22 जणांचा म्युकरमायकोसिस या आजाराने मृत्यू झाला आहे.

म्युकरमायकोसिसचा संसर्ग वाढला असताना रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देताना मोठ्या प्रमाणात प्रशासनाची हतबलता दिसून येत आहे. तसेच रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

देशातुन कोरोना हद्दपार; देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 75 दिवसांतील सर्वात मोठी घट

महागाईने आतापर्यंतचे सर्व रेकाॅर्ड मोडले; महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका

नाशिकमध्ये कोरोनानंतर ‘या’ आजारांनी काढलं डोकं वर; प्रशासनाच्या चिंतेत भर

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?; सुप्रिया सुळेंनी घेतली कार्यकर्त्यांची शाळा

गेल्या 15 दिवसात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या घटली

वाह!!! आता कोरोनाला मास्कच मारणार; पुण्यातील कंपनीने बनवला ‘हा’ जबरदस्त मास्क

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More