कोरोना लसीबाबत चिंता वाढवणारी बातमी; जगभरातील तज्ज्ञांच्या सर्व्हेने एकच खळबळ
वाॅशिंग्टन | म्युटेशन पीपुल्स वॅक्सीन अलायन्सकडून 28 देशांच्या 77 महामारी शास्त्रज्ञ, वायरोलॉजिस्ट आणि संक्रमण आजार तज्ञांनी केलेल्या एका सर्व्हेने जगभरातील लोकांची चिंता वाढवली आहे. या तज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनावरील लस ही एका वर्षात अथवा त्यापेक्षा कमी वेळात अप्रभावी ठरू शकते. एका वाहिनीच्या सूत्रांनी हे वृत्त दिले आहे. मंगळवारी यासंबंधी सर्व्हे प्रकाशित करण्यात आला. यात ही धोक्याची घंटा देण्यात आली की कोरोना व्हायरसवरील सध्याच्या लसी या आजार पूर्णपणे बरा करण्यास पुरेशा नाहीत. एका वाहिनीच्या सूत्रांनी हे वृत्त दिले आहे.
भारतात 5 कोटी 69 लाख 57 हजार 612 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. देशात 16 जानेवारी पासून कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन कोरोना प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. कोरोना संकटाची नवी लाट येत असल्याचे लक्षात येऊ लागताच देशभर लसीकरणाचा वेग वाढवण्याची तयारी सुरू आहे.
केंद्र सरकार मर्यादीत काळासाठी कोरोना प्रतिबंधक लसीची निर्यात थांबवण्याचा विचार करत आहे. जास्तीत जास्त डोस भारतीयांसाठी उपलब्ध करुन देऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याबाबत केंद्र सरकार गंभीरपणे विचार करत आहे.
दरम्यान, विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन जगभर सक्रीय आहेत. यापैकी काही अवतारांवर भारतीय लस प्रभावी ठरल्या आहेत. पण आपल्या आसपास कोरोना विषाणूचा नक्की कोणता स्ट्रेन सक्रीय आहे हे सामान्य व्यक्ती ओळखू शकत नाही. याच कारणामुळे लस घेतली तरीही कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
थोडक्यात बातम्या –
पुण्यात एकाच दिवशी 1 लाख नागरिकांना कोरोना लस, सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
लग्नानंतर नवरी स्वतःच गाडी चालवत पोहोचली सासरी; व्हिडीओ तुफान व्हायरल
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा, कोरोना चाचण्याचे दर केले कमी
पुण्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा धक्कादायक आकडा, पाहा आजची आकडेवारी!
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; मृत्युसंख्येत नवा विक्रम
Comments are closed.