बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबान्यांमध्येच तांडव! नव्या सरकारमध्ये फूट, उपपंतप्रधानांनी काबूल सोडलं

काबूल | अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर मुल्ला मोहम्मद हसन अखुंड यांच्या नेतृत्वाखाली तालिबानने सरकार स्थापन केलं. काळजीवाहू नव्या सरकारची घोषणा तालिबानने 7 सप्टेंबर 2021 रोजी केली. सरकार फक्त 6 महिने सत्तेत असल्याचं तालिबानकडून जाहीर केलं आहे. मात्र, तालिबानच्या या नव्या सरकारमध्ये आता फुट पडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे साऱ्या जगाचं लक्ष त्याकडे लागून आहे.

तालिबानच्या नवीन सरकारमध्ये मुल्ला अब्दुल गनी बरादर यांना उपपंतप्रधान पद देण्यात आलं आहेत. काही दिवसापुर्वी तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात संघर्ष सुरू झाला. ज्यामध्ये बरादर यांना गोळी लागली. त्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरादर काबूल सोडून पळून गेले. आता पुन्हा बरादर आणि हक्कानी नेटवर्कचे नेते खलील उर-रहमान यांच्यामध्ये वाद  चालू झाला आहे. यावेळी अफगाणिस्तानमध्ये दोन्ही गटांचे समर्थक आपापसात भिडले असल्याची बातमी समोर येत आहे.

तालिबान आणि हक्कानी यांच्यात सध्या तालिबानच्या श्रेयवादांवरून वाद चालू आहेत. यावर हक्कानी म्हणाले की,  आमच्याच आक्रमकतेमुळे अफगाणिस्तानमधील सत्ता मिळाली. तर आमच्या गटाच्या रणनितीमुळे तालिबान जिंकल्याचा दावा बरादर यांनी केला आहे.

दरम्यान, तालिबानच्या नवीन सरकारमध्ये हक्कानी नेटवर्कला प्रमुख भूमिका हवी आहे. परंतु तालिबानच्या इतर नेत्यांना ही भूमिका मान्य नाही. त्यामुळे यांच्यात संघर्ष चालू झाला आहे. पंजशीरमध्ये कब्जा मिळवल्यानंतर दोन्ही गटांनी आपापसात गोळीबार केला होता. त्यामध्ये बरदार हा जखमी झाला आहे, अशी बातमी बीबीसीने दिली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

….म्हणून श्रीपाद छिंदमला पुन्हा अटक, ‘त्या’ प्रकरणामुळे अडचणीत!

देशात डेंग्यूचं थैमान! तब्बल ‘इतक्या’ हजार लोकांना डेंग्यूची लागण

पुराच्या पाण्यातील बोलेरोचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही झाले चकीत, पाहा व्हिडीओ

मैदानावर पुन्हा आवाज घुमणार! प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘मला रोहित शर्मासारखं…’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ धडाकेबाज क्रिकेटपटूची बायको रोहितवर फिदा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More