‘या’ राज्यात कंडोम झालं बॅन!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | भारतासारख्या विकसनशील देशात कंडोम (Condoms), पिरियडस आणि सेक्स एॅज्युकेशन बद्दल खूप कमी बोललं जात. त्यावर मोकळ्यापणानं कधी बोलायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर टिका केली जाते किंवा त्याची चेष्टा केली जाते. मात्र अशा गोष्टी भारतातील तरुणाईला दुसरीकडे कुठेतरी भरकटवत असल्याचं दिसून येत आहे. हे असं सांगण्याचं कारण म्हणजे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांवर बंदी आणली असल्याची चर्चा सुरु आहे.

नोव्हेंबर-डिसेंबर 2022 दरम्यान शाळेतील काही विद्यार्थी शाळेत फोन घेऊन येत असल्याचं शाळा प्रशासनाला शंका आली. त्यामुळे बंगळूरमधील (Bangalore) एका शाळेत 8 वी 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या बॅगा चेक करण्यात आल्या आणि त्यावेळी शाळेतील शिक्षकांना धक्काच बसला आहे.

त्या तपासणीत शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या बॅगेतून कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, लायटर, सिगारेट(cigarettes,), व्हाईटनर आणि काही रोख रक्कम सापडली. इतकंच नव्हे तर काहीजणांच्या बॅगमध्ये दारूच्या बाटल्या देखील सापडल्या. शालेय दशेतील विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये या सगळ्या गोष्टी सापडणं हे शाळेतील शिक्षकांसाठी धक्कादायक होतं.

त्यामुळे हा विषय तेव्हापासून चर्चत होता. अल्पवयीन मुलांना कंडोम दिलंच कसं जात? असा सवाल उपस्थित केला गेला. त्यामुळे गेली काही दिवस कर्नाटकात अल्पवयीन मुलांसाठी कंडोम बॅन करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे. राज्य औषध नियंत्रण विभागातर्फे (Drug Control Department) सर्व फार्मासिस्टना परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

त्यामध्ये कर्नाटक सरकराने 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या (Contraceptive pills) च्या विक्रीवर बंदी घातली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या या घटनेमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. म्हणजेच कर्नाटकात कंडोम बॅन झालं नसून अल्पवयीन मुलांना ते खरेदी करता येणार नाही आहे.

महत्त्वाच्या बातम्या