Train Ticket l रेल्वे प्रवासाचे तिकीट निश्चित (Confirm) होण्यासाठी आता प्रवाशांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. पश्चिम रेल्वेवर (Western Railway) तिकीट रद्द करण्याचे प्रमाण घटले आहे. प्रवाशांना आरक्षण करताना अनेकदा प्रतीक्षा यादीत राहावे लागते, परंतु आता प्रतीक्षा यादीतील तिकिटे रद्द होण्याचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
प्रतीक्षा यादीत घट :
गेल्या काही महिन्यांपासून, रेल्वे प्रशासनाने प्रतीक्षा यादीची मर्यादा कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्लीपर आणि थर्ड एसी डब्यांमध्ये जास्त प्रतीक्षा यादीची तिकिटे दिली जात नाहीत. पूर्वी, तिकीट चार्ट तयार झाल्यानंतरही, तिकीट खिडकीवरून प्रतीक्षा यादीतील तिकिटे घेतलेल्या प्रवाशांना रेल्वेत प्रवास करण्याची मुभा होती.
मात्र, आता केवळ निश्चित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेमध्ये प्रवास करण्याची परवानगी आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना रेल्वेतून उतरवले जात आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे, प्रवाशांना त्यांचे तिकीट निश्चित होईल की नाही, याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत, पश्चिम रेल्वेच्या स्लीपर वर्गातील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांच्या संख्येत ६१% नी घट झाली आहे, तर थर्ड एसीमधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांची संख्या २४% नी कमी झाली आहे.
Train Ticket l आरक्षित डब्यात बदल :
मध्य रेल्वेने (Central Railway) प्रतीक्षा यादीतील तिकिटांची संख्या एकूण तिकीट विक्रीच्या १० टक्क्यांपेक्षा कमी केली आहे. पश्चिम रेल्वेने देखील असाच निर्णय घेतला आहे, ज्यामुळे प्रतीक्षा तिकिटे योग्य प्रमाणात दिली जात आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कटिबद्ध आहे.
प्रतीक्षा यादीतील प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करणार नाहीत, याची रेल्वे प्रशासन काळजी घेत आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक (Vineet Abhishek) यांनी सांगितले. पूर्वी, आरक्षित डब्यात प्रतीक्षा यादीतील तिकिटे घेऊन प्रवास करण्यावर बंदी नव्हती, पण आता ह्या नियमात बदल करण्यात आला आहे.