साहेब नोकरी करतोय, राजकारण नाही; स्वाभिमानी DYSPनं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावलं

साहेब नोकरी करतोय, राजकारण नाही; स्वाभिमानी DYSPनं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावलं

कोल्हापूर | साहेब नोकरी करतोय राजकारण नाही, वर्दीवर बोलायचं काम नाही. तुम्ही घरी जा…, अशा शब्दांत डीवायएसपी सुरज गुरव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना सुनावलं. कोल्हापुरात हा प्रसंग घडला.

आज कोल्हापूर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक होत आहे. त्यावेळी काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांची सुरज गुरव यांच्याशी बाचाबाची झाली. 

सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ महापालिका हद्दीत आले होते. यावेळी डीवायएसपी सुरज गुरव यांनी त्यांना महापालिकेत प्रवेश करण्यापासून रोखलं.

पोलीस अधिकाऱ्यानं माजी मंत्री आणि विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना खडे बोल सुनावले. त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

श्रीपाद छिंदमला लोकांनी दिला मोठा झटका; छिंदम पिछाडीवर…

-कांगारुंना धोबीपछाड; टीम इंडियाचा एेतिहासिक विजय

अहमदनगरमध्येही भाजप आघाडीवर, पाहा काय आहेत पहिले कल…

-निकालाआधीच श्रीपाद छिंदमला दणका; भाऊ श्रीकांत छिंदमला अटक

-राम मंदिरासाठी भीक मागत नाही, अध्यादेश काढा; संघाने भाजपला सुनावले

Google+ Linkedin