Supriya Sule | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा लातूरमध्ये आली आहे. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान लातूरच्या सभेवेळी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असताना स्टेजवर काही मराठा आंदोलक आले. त्यांनी सुळेंना (Supriya Sule) मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
मराठा आंदोलकांना स्टेजवर येण्यापासून रोखल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजीही व्यक्त केली, यानंतर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. मी यांना स्टेजवर येऊ दिलं नाही म्हणून मनापासून दिलगिरी व्यक्त करते. यांचा मानसन्मान मी स्वत: करेन, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी गोंधळ
जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल आणि ओबीसीमधून मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत आरक्षण कसं मिळेल? आणि तुमची भूमिका काय असेल?, असा सवाल आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना केला.
सत्ताधारी पक्ष तुमच्याकडे बोट करत आहेत. त्यांनी बोलावलेल्या बैठकीला आपण गेला नाहीत. तुम्ही भूमिका सांगा, आम्ही आजही सोबत आहोत, उद्याही सोबत राहू, पण मराठा आरक्षणाला ओबीसीमधून पाठिंबा असेल तर, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल’, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.
Supriya Sule | आंदोलकांनी शरद पवारांनाही अडवलं
याआधी सोलापूरमध्ये शरद पवार यांचा ताफाही मराठा आंदोलकांनी अडवला होता. तर अशोक चव्हाणांना नांदेडमध्ये जाब विचारण्यात आला होता. काँग्रेसच्या बैठकीतही मराठा आंदोलक शिरले होते आणि त्यांनी मराठा आरक्षणाविषयी तुमची भूमिका काय? असा सवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विचारला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बांग्लादेशातील हिंदुंबद्दल नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
स्वातंत्र्यदिनी आनंदवार्ता! सोन्याचे भाव उतरले, जाणून घ्या किमती
“अगोदर दहशतवादी हल्ले करून निघून जायचे, आता थेट सर्जिकल स्ट्राईक होतो”
लाल किल्ल्यावरून PM मोदींची देशभरातील युवकांसाठी मोठी घोषणा; म्हणाले..
“स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांचं रक्त आपल्या नसांमध्ये..”; PM मोदींचं देशवासीयांना मोठं आवाहन