Top News राजकारण

कर्नाटक विधानपरिषदेत गोंधळ; उपसभापतींना खुर्चीवरून खेचलं खाली

कर्नाटक | मंगळवारी सकाळी कर्नाटकाच्या विधानपरिषदेत जोरदार गोंधळ झालेला पहायला मिळाला. दरम्यान यावेळी काँग्रेस आमदारांनी उपसभापतींनाच त्यांच्या खुर्चीवरून खाली खेचण्याचा प्रकार घडलाय.

गोहत्या बंदी विधेयक सभागृहात सादर करण्यात येणार होतं. दरम्यान यावेळी या विधेयकाविराधात काँग्रेसला मतदान करायचं होतं. यावरूनच सभागृहाचं कामकाज सुरु होताच काँग्रेसच्या आमदारांनी उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचून बाहेर काढलं.

काँग्रेस आमदारांच्या म्हणण्यानुसार, उपसभापतींनी त्यांच्या खुर्चीवर बसणं हे असवैधानिक आहे.

भाजपाचे आमदार लेहर सिंह सिरोया यासंदर्भात बोलताना म्हणाले, आमदार अगदी गुंडांसारखे वागले. त्यांनी उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचून त्यांच्याशी गैरवर्तन केलंय. इतिहासात इतका लाजिरवाणा दिवस मी पाहिलेला नाही.”

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द!

‘भारतात फेसबुकवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण’; राहुल गाधींचा गंभीर आरोप

“अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही”

“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं थांबवावं”

वर्षेभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतेय हे उघड झालंच ना?- आशिष शेलार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या