बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय राडा; भाजपच्या पाच आमदारांचं निलंबन

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये बीरभूमी येथे आगीच्या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. बीरभूमी प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजप आणि तृणमुल काॅंग्रेसमध्ये जोरदार राडा  झाल्याचं समोर आलं आहे.

बीरभूमी प्रकरणावर चर्चेची मागणी करत भाजप आमदारांनी सत्ताधारी तृणमुलला कोंडीत पकडलं आहे. चर्चेची मागणी करत असताना भाजप आणि तृणमुलच्या आमदारांमध्ये हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी हाणामारीचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह पाच भाजप आमदारांना निलंबीत केलं आहे. परिणामी भाजपनं पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, बीरभूमी हिंसाचारात 8 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला होता. यावरून ममतांवर जोरदार टीका होताना दिसत आहे. पश्चिम बंगालमधील भाजप आमदारांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

थोडक्यात बातम्या – 

नवाब मलिक प्रकरणी ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

वाढत्या महागाईमुळे काॅंग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

“आमदारांना घरे देण्याचा निर्णय झाला नाही”; ठाकरे सरकारचा यु-टर्न

“आंडू पांडूंनी माझा नाद करू नये”; भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

“राजीनामा मागणारे विरोधक आणि…”; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More