बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात लसीकरणाच्या नोंदणीत गोंधळ; तरूणांमध्ये संतापाचं वातावरण

पुणे | महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणाचा चौथा टप्पा सध्या सुरू झाला आहे. यात राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण सुरू केलं आहे. पण सध्या सर्वत्र लसीचा तुटवडा जाणवत असल्यानं लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. पण पुण्यात वेगळाच गोंधळ पहायला मिळत आहे. पुण्यात लसीकरणाच्या नोंदणीत गोंधळ होत असल्याचं चित्र समोर येत आहे.

लसीकरणासाठी पुण्यासाठी 8 वाजता ऑनलाईन नोंदणी सुरू होते, मात्र पावणे आठच्या सुमारास लसीकरण केंद्रांवरील बुकिंग फुल झाल्याचं दाखविलं जात आहे. लसीच्या स्लॉट बुकिंगमध्ये वशिलेबाजी सुरू असल्याचा आरोप पुण्यातील सामान्य लोक करत आहेत. सामान्य लोक हातात मोबाईल घेऊन बुकिंगसाठी धडपड करताना दिसत आहे.

पुणे शहरात तरूण वर्गाची लोकसंख्या सुमारे 22 लाख इतकी आहे. राज्य सरकारकडून 10 दिवसांत फक्त 15 हजार लसींचे डोस आले आहेत. त्यातील 13 हजार जणांचे लसीकरण झालं आहे. त्यामुळे पुण्यात मंगळवारी केवळ दोनच केंद्रावर लसीकरण चालू आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचं मोठं आव्हान पुणे महापालिकेसमोर आहे.

दरम्यान, स्लॉटसाठी लिंक ओपन करण्याचे सर्व अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. शासनाचा यात काही संबंध नाही, असं कुटुंब नियोजन मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. प्रशासनाच्या या सावळ्या गोंधळामुळे सामान्य लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

थोडक्यात बातम्या-

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूनं घेतली क्रीडा राज्यमंत्रिपदाची शपथ

ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

दीड वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांच्या मांडीवर सोडला प्राण, नंतर वडिलांनी केलं अभिमानास्पद कृत्य…

‘या’ जिल्ह्यातील रुग्णालयांना महत्त्वपूर्ण आदेश; आता फक्त ‘या’ कारणासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More