Congress NCP 1 - काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार? आज संयुक्त बैठक
- Uncategorized

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार? आज संयुक्त बैठक

मुंबई | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तयारी चालवली आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पहिली संयुक्त बैठक आज पार पडणार आहे. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेसकडून विखे पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. 

शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेतलाय, त्यापार्श्वभूमीवर जर दोन पक्षांची आघाडी झाली तर भाजपसाठी ती डोकेदुखी ठरु शकते.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा