बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पहिल्यांदा टीका, आता अभिनंदन! चित्रा वाघ यांच्याकडून रूपाली चाकणकरांना खास शुभेच्छा

मुंबई | राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत रूपाली चाकणकर यांचं अभिनंदन केलं आहे. चित्रा वाघ राष्ट्रवादीत असताना रूपाली चाकणकर यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती.

रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, मी त्यांच मनापासून अभिनंदन करते, अशा आशयाचं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. परंतु, सुरूवातीला रावणाला मदत करणारी शुर्पनखा नको, अशी विरोध दर्शवणारी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. आता पुन्हा त्यांनी चाकणकरांच अभिनंदन केलं आहे.

रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होणार अशी चर्चा होती. बुधवारी अखेर रूपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. यावर चित्रा वाघ यांची काय प्रतिक्रिया येणार याकडे अनेकांच लक्ष होतं. नेटकऱ्यांनी चित्रा वाघ यांच्या नावाने अनेक मिम्स समाज माध्यमांवर व्हायरल केले  होते.

दरम्यान,चित्रा वाघ यांनी भाजपने दोन वर्षापासून दिलेल्या लढ्याला यश मिळाले. राज्य सरकारला अखेर महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्यास मुहूर्त मिळाला, असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. रूपाली चाकणकर यांचं अभिनंदन करताना चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला चिमटे काढले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक केली तसेच इतर सदस्याचीही नियुक्ती त्वरीत करावी, म्हणजे कामकाज पुर्ण क्षमतेने होईलं, असंही चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

बाॅलिवूडमध्ये पुन्हा खळबळ! ड्रग्ज प्रकरणी आता अभिनेत्री अनन्या पांडेला समन्स

सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे सेकंड हॅंड कारला आले ‘अच्छे दिन’

शाहरूख खान लेकाच्या भेटीला तर ‘मन्नत’वर एनसीबीचा छापा

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More