बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“डबल इंजिन सरकारने बिहारमधील सर्व जिल्ह्यांमध्ये 100 रुपये लिटर पेट्रोल केल्याबद्दल अभिनंदन”

पाटणा | गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये केंद्र सरकार विरोधात प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. वाढत्या पेट्रोलच्या दरावरून राजकीय वर्तुळात देखील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालूच आहेत. अशातच आता आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर झाल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह बिहारच्या सरकारचे अभिनंदन केले आहे.

लालू प्रसाद यादव यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन ट्वीट करत मिश्कील पद्धतीने नितीश कुमार सरकारची खिल्ली उडवली आहे. लालू प्रसाद यादव ट्विट करत म्हणाले की, दुहेरी शक्तीच्या जोरावर डबल इंजिन सरकारने बिहारमधील सर्व जिल्ह्यात पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर केले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

बिहारमध्ये विरोधी पक्षातील नेते सातत्याने महागाईच्या मुद्यावरुन सत्तधारी पक्षाला टार्गेट करत आहेत. लालूप्रसाद यादव यांनी पेट्रोलच्या वाढत्या दरावरुन केलेले हे ट्वीट खूप वेगाने व्हायरल होत आहे. यादव यांच्या ट्वीटवर कमेंट करत अनेक लोक बिहार सरकारवर टीका करत आहेत.

दरम्यान, लालू प्रसाद यादव नुकतेच जामिनावर तुरूंगातून बाहेर आले आहेत. आजकाल ते सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहेत. ते अलिकडे सातत्याने राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

आर्थिक दिलासा! कोरोना उपचारासाठी खर्च झालेल्या रकमेवर मिळणार इन्कम टॅक्स सवलत

धक्कादायक! 10 मिनिटांच्या अंतरात नर्सनं महिलेला दिले चक्क 3 लसीचे डोस

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

“अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेची समज नाही, म्हणून ‘कर्जाचे डोस’ देऊन काम चालू आहे”

“महाराष्ट्राची जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More