नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील प्रायमस रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते 63 वर्षांचे होते.
कामत कामानिमित्त दिल्लीला गेले होते. तिथं त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
दरम्यान, काँग्रेसमधील अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या नेहमीच उत्तमपणे सांभाळल्या. त्यामुळे त्यांच्या निधनाने महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याचं म्हटलं जातंय.
महत्त्वाच्या बातम्या-
-पप्पा, चांगले आहेत की वाईट?; धोनीच्या मुलीचं उत्तर सोशल मीडियात व्हायरल
-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ व्हीडिओवर एक रुपयाही खर्च नाही!
-चंद्रावर आहे गोठलेल्या स्थितीतील पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा
-मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; कोण आहे पहिल्या क्रमांकावर?
-वाजपेयींची आठवण म्हणून ‘या’ शहराचं नाव होणार ‘अटल नगर’