सातारा | सातारा येथे काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थित महाबळेश्वर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी मंत्रीपदाची स्वप्न बघून काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, “अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षातील काही मंडळी मंत्रीपदाची स्वप्न बघून भारतीय जनता पक्षात गेली. मात्र त्यांना अजूनही शपथेची स्वप्न पडत आहेत”.
यावेळी थोरात यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण खासदार व्हायला हवेत, अशी इच्छा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर संधी; एकनाथ खडसे म्हणाले…
RCBचं जेतेपदाचं स्वप्न यंदाही भंगलं; हैद्राबादची बंगळूरूवर 6 गडी राखत मात
पश्चिम बंगालच्या नागरिकांना रेल्वे मंत्रालयाने दिली ही आनंदाची बातमी!
“पुनश्च हरी ओम म्हणता अन् ‘हरी’लाच कोंडून ठेवता”
“फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपतील एका व्यक्तीने मला छळलं”