बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…आणि म्हणून काँग्रेस उद्यापासून ‘जेलभरो’ आंदोलन करणार

मुंबई | उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात लखीमपूरच्या दिशेने रवाना झालेल्या काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधींना पोलिसांनी अडवलं. पोलिस आणि प्रियंका गांधी यांच्यातील शाब्दिक गरमा गरमी नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. प्रियंका गांधींना नजर कैदेत ठेवल्याने काँग्रेसमध्ये मात्र संतापाची लाट उसळली.

4 ऑक्टोबर 1977 ला देखील त्यावेळच्या जनता पार्टीनं इंदिरा गांधींना अटक केली होती. त्याच घटनेची पुनरावृ्त्ती होत आहे. प्रियंका गांधींना अटक करत भाजपने ही पुनरावृत्ती केली आहे. त्यावेळेस जनता पार्टीची जी अवस्था झाली होती, आता तीच अवस्था भाजपची होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले म्हणाले आहेत . प्रियंका गांधींना भाजपनं सन्मानानं सोडलं नाही तर उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस देशभर हे आंदोलन करणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले आहेत. देशात हुकूमशाही पाहायला मिळत आहे. पण, लोकच त्यांना त्यांची जागा दाखवतील, असंही नाना पटोले पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

लखीमपूरच्या दिशेने जाणाऱ्या अनेक नेत्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवलं. यावरूनही उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका करण्यात आहे. तर केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार गांधी कुटुंबाला घाबरत असल्याचं दिसत आहे, अशी खोचक टीकाही नाना पटोलेंनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

शिवसेना खासदार पुत्राचा पालघरमध्ये पराभव

कायदा मोडणार नाही, पण लखीमपूरला जाणारच; राहुल गांधींचं मोठं स्पष्टीकरण

धुळ्यात अमरिशभाईंचाच डंका; सर्वच जागांवर भाजपने मारली बाजी

यंदाच्या दसरा मेळाव्याविषयी संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

अजब करिअरची गजब कहाणी, लग्नात करवली बनून तरुणी कमावते लाखो रुपये!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More