बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मध्य प्रदेशनंतर आता गुजरात काँग्रेसला झटका; काँग्रेसचे 7 आमदार बेपत्ता

नवी दिल्ली| मध्य प्रदेश नंतर आता भाजपनं आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे. गुजरातमधील काँग्रेसचे 7 आमदार हे काँग्रेसच्या संपर्कात नसल्याचं आता स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे आमदार जे. वी. काकडिया आणि सोमाभाई पटेल हे आमदार काँग्रेसच्या संपर्कात नाहीत. खरं तर ते आमदार भाजपला समर्थन देणार असल्याची चर्चा आहे.

राज्यसभा निवडणूकीपुर्वीच हे दोन आमदार गायब झाले असल्यामुळं काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत सापडल्याचं दिसत आहे. काँग्रेसचा आणखी 1 आमदार मंगल गावित यांच्याशीही संपर्क होऊ शकलेला नाही. ते आमदार राजीनामे सुद्धा देऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.

काँग्रेसच्या आमदारांचं संख्याबळ सध्या 73 इतकं आहे, काँग्रेस अजूनही 7 आमदारांशी संपर्क साधू शकलेलं नाही. राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं अत्यंत सावध पावलं उचलायला सुरूवात केलेली आहे. शनिवारी काँग्रेसनं आपले 14 आमदार जयपूरमध्ये हलवले होते.

गुजरातमधले हे आमदार जयपूरच्या हॉटेल शिव विलासमध्ये थांबले आहेत. या सर्व आमदारांना राजस्थान सरकारमधले महेश जोशी आणि महेंद्र चौधरी बस घेऊन शिव विलास हॉटेलमध्ये घेऊन गेल्याचं समजतंय.

ट्रेंडिंग बातम्या-

“विधान परिषेदसाठी माझी तयारी…फक्त पाटलांच्या निर्णयाची वाट पाहतोय”

“हा निर्णय म्हणजे आमचे हातपाय तोडले आणि आता पळायला सांगताय”

महत्वाच्या बातम्या-

फारुक अब्दुल्लांच्या सुटकेमागे कोण? रॉच्या माजी प्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकला- जितेंद्र आव्हाड

माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर काळाच्या पडद्याआड

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More