काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
नवी दिल्ली | काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बुधवारी ईडीने नोटीस बजावली होती. दोन्हीही नेत्यांना ईडीकडून नोटीस आल्याने अनेक काँग्रेस नेत्यांनी सवाल उपस्थित केले होते. त्यातच आता सोनिया गांधी आणि इतर काही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. सोनिया गांधी बुधवारी सेवा दलाच्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. मात्र, संध्याकाळी ताप आल्याने सोनिया गांधींची कोरोना चाचणी करण्यात आली. रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सोनिया गांधी ईडी चौकशीला हजर राहणार का?, असे सवाल केले जात होते.
कोरोना पॉझिटिव्ह असतानाही सोनिया गांधी ईडी चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर हेरॉल्ड प्रकरणात 55 कोटी रूपयांच्या फसवणूकीचा आरोप करण्यात आला होता. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात याचिका दाखल करून आरोप केला होता.
दरम्यान, ईडीने राहुल गांधी यांना गुरूवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, राहुल गांधी विदेशात असल्याने 5 जून रोजी चौकशीला सामोरे जाणार आहेत. त्यातच 8 जूनपर्यंत सोनिया गांधी यांचे प्रकृती स्वास्थ सुधारेल आणि चौकशीस हजर राहतील, अशी माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘कोलकातामधील गायक केकेपेक्षा चांगलं गाऊ शकतात’; ‘या’ गायकाचं वादग्रस्त वक्तव्य
चिंताजनक! राज्यात कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ
‘धनंजय मुंडेंनी माझ्या आईची हत्या केली’; करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप
‘त्या’ व्यक्तीला मी Mercedes-Benz बक्षीस म्हणून देणार- नितेश राणे
मोठी बातमी! काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस
Comments are closed.