नाना पटोलेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र, म्हणाले… ‘ही दरोडेखोरी आहे’
मुंबई | पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. तर दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे राजकारण देखील तापताना दिसत आहे. देशातील काँग्रेस नेते केंद्र सरकारवर टीका करताना दिसत असतात. आता राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सुद्धा सोशल मीडियावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
काँग्रेसने सोशल मीडियाद्वारे #SpeakUpAgainstPriceRise ही मोहिम सुरू केली आहे. यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह इतर अनेक दिग्गज नेते देखील सहभागी झाले आहेत. देशाच्या जनतेला आणखी किती लुटणार? तुम्हाला ही दरवाढ मागे घ्यावीच लागेल, हा आमचा तुम्हाला इशारा आहे, अशा शब्दात भाई जगताप यांनी सरकारला इशारा दिला आहे.
भाजप सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर लावणं ही दरोडेखोरी आहे. केंद्र सरकारने इंधनावरील अन्यायी करवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असं नाना पटोले यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान काँग्रेसवर टीका केली होती. राज्य सरकार देखील पेट्रोलवर कर लावत आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी कर कमी करावा असा सल्ला दिला होता. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते या मुद्यावरून आमने-सामने आले होते.
थोडक्यात बातम्या-
तब्बल 500 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘या’ देशाचा दौरा
रूसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी कायपण…; तरूणाने केला ‘हा’ कारनामा
शाहीनबाग आंदोलनाला तापसी, अनुरागने पैसा पुरवला- कंगना रनौत
बॉलिवूडमधील दिग्गज दडपशाहीविरोधात गप्प का आहेत?- संजय राऊत
कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलांसोबतचा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ
Comments are closed.