काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार? आघाडीसाठी हालचाली तीव्र

मुंबई | भाजपला सत्तेतून दूर लोटण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांशी जवळीक केल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसतं आहे, मात्र आता ही जवळीक अधिकृत करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आघाडी करुन लढण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्राथमिक बोलणी सुरु झालीय. यासंदर्भात येत्या 6 फेब्रुवारी रोजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पहिली बैठक मुंबईत पार पडणार आहे. 

पंधरा वर्षे सत्तेत एकत्र राहिल्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ही आघाडी तुटली होती. मात्र आता एकमेकांची गरज ओळखून या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचं ठरवलंय.