बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खतांच्या दरवाढीबद्दल तक्रार करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदींचे मनापासून आभार मानावेत”

मुंबई | रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ केल्यावरून राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस प्रदेेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्र लिहित खतांचे दर कमी करण्याची मागणी केली होती. खतांच्या दरवाढीला झालेल्या विरोधापुढे केंद्र सरकारने नमते घेत खतांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारवर 14 हजार 775 कोटी रुपयांचा अनुदानाचा अतिरिक्त बोजा सोसूून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या डीएपी रासायनिक खत उपलब्ध करून तक्रार करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता प्रामाणिकपणे नरेेंद्र मोदींचे आभारही मानले पाहिजेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

कंपन्यांनी भाववाढ केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत होतं. त्या दृष्टीने निर्णय प्रक्रिया चालू होती. सरकार शेतकऱ्यांना अनुदान वाढवून देण्याच्या विचारात आहे, असं केंद्र सरकारने 15 मे रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केलं होतं. त्यानंतर पांच दिवसांत निर्णयही घेतला आहे, असं पाटलांनी सांगितलं.

दरम्यान, सरकारला निर्णयप्रक्रियेसाठी पुरेसा वेळ न देता राष्ट्रवादी काँग्रेसने याविषयात राज्यभर आंदोलन सुरू केलं तर काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला. मात्र आता मोदी सरकारने तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा दिला याबद्दल पक्षांनी आभार मानावेत, असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! पुण्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला कोरोनातून मोठा दिलासा; मृत्यूचं प्रमाण कमी होऊन बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

हा भेदभाव का?, दुसऱ्या राज्यांमधील जनतेच्या प्रति आपली जबाबदारी नाही का?- पृथ्वीराज चव्हाण

महत्त्वाची बातमी! कोरोनाचा संसर्ग हवेतून होण्याचा धोका, केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

मोठी बातमी! रेमडेसिविर इंजेक्शन आता कोरोना रूग्णांना दिलं जाणार नाही; WHO ने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More