बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…वाटलं होतं मोदी काहीतरी पाऊल उचलतील पण त्यांच्याकडे ‘थाळी टाळी आणि दीपावली’ शिवाय काहीच नाही”

मुंबई |  प्रथमत: टाळी आणि थाळ्या वाजवायला सांगितल्यानंतर आता मेणबत्ती, दिवा किंवा मोबाईलची टॉर्च लाईट जाळायल्या सांगणाऱ्या पंतप्रधान मोदींवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विट करून मोदींवर निशाणा साधला आहे.

कोरोनाने बेरोजगार झालेल्या कामगारांना काहीतरी दिलासा देणारा निर्णय पंतप्रधान घोषित करतील. पण ‘थाळी टाळी आणि दीपावली’ शिवा त्यांच्याकडे काहीच नाही, अशा शेलक्या शब्दात अतुल लोंढे यांनी मोदींवर टीका केली आहे.

आशा होती की कोरोनाला परतवून लावण्यासाठी पंतप्रधान मोदी काहीतरी ठोस पाऊल उचलतील परंतू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या हाताल निराशा आलेली आहे. जनता सरकारने घालून दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन करत आहेमात्र सरकार कोरोनापासून जनतेचं रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरते आहे, असं राजीव सातव म्हणाले आहेत.

दुसरीकडे भाजपने मात्र पंतप्रधान मोदींच्या मोहिमेचं क्ंबहुना उपक्रमाचं कौतुक केलं आहे. अंधकाराला पळवून लावण्यासाठी येत्या रविवारी रात्री 9 वाजता आपण सगळ्यांनी दिवे लावूया तसंच भारतमातेचं स्मरण करूया, असं भाजप नेत्यांनी ट्विट करून आवाहन केलं आहे.

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही’ असं म्हणणारे मौलाना साद आता म्हणतात…

दिल्लीसारखा महाराष्ट्रातही होणार होता तबलिगीचा कार्यक्रम; गृह विभागाच्या सतर्कतेनं धोका टळला

महत्वाच्या बातम्या-

5 एप्रिलच्या रात्री 9 वाजता घरातल्या लाईट बंद करा आणि दरवाजात दिवे लावा अन् कोरोनाला पळवा- मोदी

टाळ्या अन् थाळ्या नंतर आता घरातले दिवे बंद करून दिवा किंवा टॉर्च लावा; मोदींचा नवा उपक्रम

“लॉकडाउन संपेपर्यंत झोपडपट्टी आणि चाळींमधल्या लोकांना स्थलांतरित करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More