बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांच्या त्या टीकेला बाळासाहेब थोरातांचं उत्तर, म्हणाले…

मुंबई | शरद पवार काय म्हणाले, त्याची पूर्ण स्पष्टता नाही, मात्र त्यांच्या एखाद्या वक्तव्यावरुन माध्यमांनी निष्कर्षापर्यंत पोहोचून पंतप्रधानांना क्लीन चिट आणि राहुल गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा आततायीपणा करु नये, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले आहे आहेत.

चीन प्रश्नी काँग्रेस पक्ष सरकारसोबत आहे. मात्र त्याचा अर्थ राष्ट्रहिताचे मुद्दे मांडू नये असा होत नाही. सीमा सुरक्षेबाबत राहुल गांधी यांनी सरकारला प्रश्न विचारणे हे राजकारण नाही तर जनतेने दिलेली जबाबदारी आहे. 1962 आणि आजच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे, असंही थोरात म्हणाले.

आपले 20 जवान शहीद झाले. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सीमेत कोणीही घुसले नाही, असे म्हणत आहेत. त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन चीन आपल्या शहीदांना घुसखोर ठरवत आहे. याचे दु:ख काँग्रेसप्रमाणेच शरद पवार यांनाही असेलच, असं थोरात म्हणाले.

राहुल गांधी जनतेच्या मनातील प्रश्न सरकारला विचारत आहेत. राहुल गांधींची चिंता ही देशाच्या अखंडतेशी सबंधित आहे. आजही ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी चीनच्या आगळीकीबद्दल चकार शब्दही काढला नाही. अशावेळी गप्प बसून कसे चालेल?, असा सवाल थोरातांनी विचारलाय.

ट्रेंडिंग बातम्या-

चंद्रकांत पाटलांना पहिल्यांदा चंपा कुणी म्हटलं? अनिल गोटेंनी जाहीर केलं ‘त्यांचं’ नाव

देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे

महत्वाच्या बातम्या-

इंधन दरवाढीविरोधात 29 जूनला काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन!

राज्यातील ‘या’ भागात पुन्हा लॉकडाउन लागू

‘…तर राज्यात पुन्हा कडक लॉकडाउन लागू करावा लागेल’; उद्धव ठाकरेंचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More