Top News महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंनी नेतृत्व कसं करायचं असतं हे दाखवून दिलं- बाळासाहेब थोरात

मुंबई |  आयएनएस आणि सी-व्होटर्सने लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत एक देशपातळीवर सर्व्हे केला. या लोकप्रिय 5 मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी समाधान व्यक्त करत उद्धव ठाकरेंच्या कामकाज करण्याच्या एकूण शैलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमधील समावेश होणं निश्चित महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे तशी अभिमानाची बाब मंत्रिमंडळआतील सहकारी म्हणून आमच्यासाठी देखील आहे, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व कसं करावं हे सगळ्यांना दाखवून दिलं आहे. हे तीन पक्षांचं सरकार आहे. असं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सरकारचं उत्तम नेतृत्व करत आहेत, अशा शब्दात थोरातांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.

महाराष्ट्रात स्थापन झालेलं  महाविकास आघाडीचं सरकार सर्व सामान्य व्यक्तीवर लक्ष केंद्रीत करणारं आहे. वेगवेगळी विचारधारा एकत्र आलेल्या आहेत. असं असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचं यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत, असं थोरात यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे माझं नाव लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमधील समावेश होणं हे माझ्या एकट्याचं यश नसून हे यश तुम्हा सर्वांचं आहे. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचं हे राज्य पुढं नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचं हे यश आहे. मुख्यमंत्रीपद हे फक्त निमित्त आहे महाराष्ट्र राज्याची सेवा घडते आहे हे महत्त्वाचं… असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

कडक मुख्यमंत्री धडक निर्णय; आंध्रात टॅक्सीचालकांना मिळणार प्रत्येकी 10 हजार रुपये!

नुकसान भरपाई देताना नागरिकांना विश्वासात घ्या; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

महत्वाच्या बातम्या-

“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला हे माझं एकट्याचं नाही तर तुम्हा सर्वांचं यश”

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमधील काही निर्बंध केले शिथील तर नव्या उपक्रमांना दिली संमती!

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ‘या’ तारखेपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या