देश

काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?

बंगळुरू | कर्नाटकमध्ये काँग्रेसचे असंतुष्ट आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं समजतंय. त्यामुळे हे आमदार आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

कर्नाटक मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये काँग्रेसला पाच मंत्रीपदे भरायची आहेत. त्यामुळे या मंत्रीमंडळ विस्तारात ज्या आमदारांना स्थान मिळणार नाही, त्या आमदारांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, भाजपने आमच्या आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे, परंतु भाजपची ही योजना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव व मंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदींची एकतर्फी मुलाखत म्हणजे प्रपोगंडाच; शिवसेनेची सामनातून टीका

-शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी’वर पोलीस केस

-पाकिस्तानमध्ये विजयी झालेला ‘चहावाला’ निघाला कोट्यधीश

-हिंमत असेल तर रिफायनरीच्या समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा!

-महाआघाडीला घाबरण्याची गरज नाही, निवडणूक जिंकण्याची जबाबदारी माझी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या