निकालाआधी कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा मोठा दावा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | कसबा पोटनिवडणुकीत माझा विजय निश्चित असून किती मतांच्या फरकाने निवडून येणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे. निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतांना रवींद्र धंगेकर यांनी हा दावा केला आहे.

कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यावेळी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. त्यावेळी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत पाहायला मिळत आहे. याच निवडणूक काळात दिग्गज नेत्यांनी प्रचार करत कसबा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं पाहायला मिळत आहे.

आज मतमोजणी होत असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार असले तरी रवींद्र धंगेकर यांनी आपला विजय निश्चित असून 15 हजार मतांच्या फरकाने मी विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-