Top News देश राजकारण

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील रूग्णालयात दाखल

दिल्ली | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज संध्याकाळी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सोनिया गांधी यांना रुटीन चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी. एस. राणा यांच्या सांगण्यानुसार. आज संध्याकाळी 7 वाजता सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांच्या नियमित चाचण्या तसंच तपासण्या करायच्या आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

यापूर्वी देखील सोनिया गांधी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना पोटदुखीची समस्या जाणवत होती. फेब्रुवारी महिन्यात पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काही वेळापूर्वीच सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यात यावं अशी मागणी करण्यात आलीये आहे. तसंच या बैठकीत करोना, भारत-चीन यांच्यातले तणावपूर्ण संबंध, सध्याची राजकीय स्थिती या सगळ्या विषयांवर चर्चा झाली.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनामुळं राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर, पण…- उद्धव ठाकरे

अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार- रामदास आठवले

राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा, म्हणाले…

हार्दिक पांड्या झाला बाबा; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला इशारा, म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या