मुंबई | विधानपरिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Election) आज मतदान पार पडलं असून सर्वांचं लक्ष आता मतमोजणीकडे लागलं आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रणांगणात उतरल्याने चुरसीची लढत पाहायला मिळत आहे.
भाजप (BJP) व महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना भाजपच्या दोन मतांवर काँग्रेसने (Congress) आक्षेप घेतला आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) व लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या मतांवरून काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
भाजपच्या या दोन आमदारांसोबत दोन सहकारी उपस्थित होते व त्यांनी मतदानपेटीत मत टाकल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. भाजपच्या या दोन मतांवर आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, 5 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार होती. मात्र, काँग्रेसने आमदार मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर आक्षेप घेतल्याने मतमोजणीला उशीर होण्याची शक्यता आहे. तर निवडणूक आयोगाच्या निकालानंतरच मतमोजणीला सुरूवात होणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर…’, दीपाली सय्यद यांची तुफान टोलेबाजी
अग्निवीरांसाठी सर्वात मोठी घोषणा, आता ‘इतका’ पगार मिळणार
‘…त्यामुळे शिवसेनेचा एक उमेदवार 100 टक्के पडणार’, रवी राणांचं मोठं वक्तव्य
अरुण गवळी पुन्हा येतोय!, पहायला मिळणार नवा थरार!
अग्निपथ योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणारे सरकारच्या निशाण्यावर केली धडक कारवाई
Comments are closed.