बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एमआयएम आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू”

मुंबई | असदुद्दीन ओवैसी प्रमुख असलेला एमआयएम पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एमआयएम भाजपच्या इशाऱ्यावर धार्मिक ध्रुवीकरणाचे काम करत असते, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

एमआयएम आणि भाजप हे पक्ष धार्मिक ध्रुवीकरण करतात हे वेळोवेळी स्पष्ट झालं आहे. कोणत्याही पक्षाची कट्टरता हे देशासाठी घातकच आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून एमआयएम आणि भाजपचा विरोध करायला हवा, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

आम्ही 15 कोटी आहोत पण 100 कोटींवर भारी आहोत हे लक्षात ठेवा, असं बेताल वक्तव्य एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केलं होतं. या संदर्भत देत सचिन सावंत यांनी भाजप आणि एमआयएमवर टीकास्त्र सोडलं आहे.

ज्याप्रमाणे वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, त्याचप्रमाणे भाजपचे योगी आदित्यनाथ, गिरीराज सिंह, प्रवेश वर्मा, अनुराग ठाकूर बेताल वक्तव्य करत असतात, असंही सावंत म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

‘त्या’ व्हायरल व्हीडिओबाबत नवाब मलिकांचं स्पष्टीकरण; म्हणतात…

“वारिस पठाण हे लावारीस पठाण आहेत; समोर आले तर थोबाडीत देईन”

मराठी बातम्या-

“ब्राह्मण समाजातील अर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील”

शरद पवार म्हणतात… ‘ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही’

इंदोरीकरांच्या वक्तव्याचा परिणाम; आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचे संकेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More